Shri Mouni Vidyapeeth Logo

श्री मौनी विद्यापीठ

हुतात्मा मुरलीधरनगर, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

(महाराष्ट्र राज्य) पिन - ४१६२०९ | कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३२४-२२००११

रजि. नं. कोल्हापूर / ई-४२

Shri Mouni Vidyapeeth Logo
ग्रामीण शासन व प्रशिक्षण विभाग

पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र (PRTC) व ग्रामसेवक केंद्र (GTC)

महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागांतर्गत मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था

स्थापना १९६२

पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र (Panchayat Raj Training Centre - PRTC)

१ सप्टेंबर १९६२ रोजी स्थापन झालेले PRTC केंद्र जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देते. आतापर्यंत ७,११० पेक्षा जास्त सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय योजना, ई-ग्रामपंचायत व लोकशाही प्रशासनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्थापना १९६४ • १००% शासन अनुदान

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र (Gramsevak Training Centre - GTC)

१५ जून १९६४ रोजी सुरु झालेले GTC केंद्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आयुक्तालय, पुणे यांचेकडून १००% वेतनानुदानावर चालविले जाते. या केंद्रात रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

७,११०+ लोकप्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दर्जेदार प्रशिक्षण.

१००% शासन अनुदान

महाराष्ट्र शासनाकडून १००% अनुदानित प्रशिक्षण वर्ग.

३ जिल्ह्यांचे नोडल केंद्र

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्र.