Shri Mouni Vidyapeeth Logo
स्थापना १९५२

श्री मौनी विद्यापीठ

हुतात्मा मुरलीधरनगर, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य) पिन - ४१६२०९

Shri Mouni Vidyapeeth Logo
Location
Phone
Email
कृषी शिक्षण व संशोधन विभाग

कृषी तंत्रनिकेतन व ७६ एकर कृषी प्रात्यक्षिक फार्म

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी यांच्याशी संलग्न

३ वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम

कृषी डिप्लोमा (Diploma in Agriculture)

श्री मौनी विद्यापीठातील कृषी तंत्रनिकेतन हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी यांच्याशी मान्यताप्राप्त असून २०२२ सालापासून यशस्वीरीत्या कार्यरत आहे. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ३ वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रवेश क्षमता: ४० जागा.

प्रात्यक्षिक शेती

७६ एकर कृषी प्रात्यक्षिक फार्म व संशोधन

संस्थेकडे ७६ एकराचा विस्तीर्ण परिसर असून २५ एकरावर प्रत्यक्ष लागवडयोग्य शेती फार्म आहे. यामध्ये उस, आधुनिक बियाणे, ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय व जलसंधारण प्रात्यक्षिके स्थानिक शेतकऱ्यांना दिली जातात.

विद्यापीठ संलग्नता

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार अध्यापन.

प्रत्यक्ष शेती अनुभव

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ७६ एकर शेतात प्रात्यक्षिक अनुभव मिळतो.

रोजगार व स्वयंरोजगार

कृषी केंद्र, रोपवाटिका व बियाणे उद्योगासाठी रोजगाराच्या उत्तम संधी.